जळगावात अनोळखी वृद्धाचा मृत्यू


जळगाव : शहरातील बेंडाळे चौकातील कोंबडी बाजार परीसरात बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी वृध्दाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी चार वाजता मृत्यू झाला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन जिल्हापेठ पोलिसांनी केले आहे.

ओळख पटवण्याचे आवाहन
शहरातील बेंडाळे चौकाजवळील कोंबडी बाजार परीसरात सोमवार, 12 जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनोळखी अंदाजे साठ वर्षीय वृध्द व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळून आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेवून अनोळखी वृध्दाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. शुक्रवार, 16 जून रोजी वृध्दावर उपचार सुरू असतांना दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !