चाळीसगावात 18 लाखांचा गुटखा जप्त : तरुणाविरोधात गुन्हा

गुटख्याचा संशय न येण्यासाठी वाहनाच्या कॅबीनवर ठेवल्या शेतीमालाच्या जाळ्यात


Gutkha worth 18 lakhs seized in Chalisgaon : Crime against youth चाळीसगाव : अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो चाळीसगाव पोलिसांनी खरजई रोडवरील रेल्वे गेटजवळ ताब्यात घेत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त केल्यानेे शहरातील गुटखा तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई बुधवार, 14 जून रोजी करण्यात आल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय गुलाब कोतकर (24 गुरुवर्य नगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

जमावाने फोडल्या वाहनाच्या काचा
खरजई रस्त्याने चाळीसगांवकडे येणारा पिकअप (एम.एच. 19 सी.एक्स.0083) मध्ये गुटखा येत असल्याचा संशय नागरीकांना आल्यानंतर बुधवारी नागरीकांनी वाहन अडवल्यानंतर त्यातील गुटखा पाहून जमावाने वाहनाच्या काचा फोडत वाहनातील चालक अक्षय गुलाब कोतकर यास चोप दिला होता तर चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी धाव घेत पिकअप पोलीस ठाण्यात आणत अन्न व औषध प्रशासनाला सूचित केले मात्र पथक न आल्याने अखेर पोलिसांनीच या प्रकरणी फिर्याद दिली. पोलीस शिपाई अमोल युवराज भोसले यांच्या फिर्यादीवरून गाडी चालक अक्षय गुलाब कोतकर (24, चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशय न येण्यासाठी कॅबीनवर शेतीमालाच्या जाळ्या
संशयित कोतकर याने वाहनातून गुटख्याची तस्करी होत असल्याचा संशय येवू न यासाठी वाहनाच्या कॅबीनवर शेती मालाच्या जाळ्या ठेवल्या मात्र सुज्ञ नागरकांनी संशयिताला हेरत चोपले व पोलिसांना माहिती कळवली. दरम्यान, या वाहनातून राज्यात प्रतिबंधीत 18 लाख 32 हजार 904 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून सात लाख रुपयांची बोलेरोदेखील जप्त करण्यात आली. या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !