बोरनारच्या विवाहितेचा विनयभंग करीत पतीलाही मारहाण
Bornar’s wife was molested and beaten up by her husband जळगाव : महिलेच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत तिचा विनयभंग करण्यात आला व याबाबत जाब विचारणार्या पीडीतेच्या पतीला मारहाण करण्यात आली. ही घटना जळगाव तालुक्यातील बोरनार येथे सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे 24 वर्षीय महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. 19 मे रोजी मध्यरात्री महिला घरात झोपलेली असतांना संशयित सोनू रामदास मराठे, योगेश सुभाष पवार यांनी महिलेच्या घरात प्रवेश करीत तिचा विनयभंग केला तर याबाबत पतीने जाब विचारल्यानंतर त्यांच्यासह संशयित शोभाबाई सोनू मराठे आणि जयेश उर्फ दादू सोनू मराठे (सर्व रा.बोरनार, ता.जि.जळगाव) या चौघांनी दाम्पत्यास शिविगाळ करीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. दरम्यान, महिन्याभरानंतर महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.


