विद्यार्थ्यांनी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची : उद्यापासून सकाळ सत्रात भरणार शाळा
Students, this news is important for you: School will be in session from tomorrow morning जळगाव : वाढत्या उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असतानाच व पावसाने ओढ दिल्यानरे उकाडा वाढला असताना जिल्हा परीषद व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत होती. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना होणार्या गैरसोयीची दखल घेत सोमवार, 19 जूनपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळ सत्रात भरविण्याचे निर्देश दिल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
असा आहे शिक्षण विभागाचा आदेश
सोमवार, 19 जूनपासून शाळेच्या जिल्हा परीषद खाजगी प्राथमिक प्राथमिक शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी 12 पर्यंत करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहेत तर ज्या माध्यमिक शाळा एक सत्रात भरतात त्यांची वेळ सकाळ सत्रात करण्यास माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी परवानगी दिली आहे. सर्व अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित माध्यमिक शाळांना हा आदेश बंधनकारक आहे.
दोन सत्रातील शाळांनाही मिळावी परवानगी
जिल्ह्यातील अनेक शाळा दोन सत्रात भरत असल्याने त्यांना देखील सकाळच्या सत्रातच शाळा भरविण्याची परवानगी शिक्षण विभागाने द्यावी, अशी मागणी होत आहे मात्र त्यासाठी जागा उपलब्धतेचा निकषही लावण्याची अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजेनंतर उष्णता आणि घाम यांचा अधिक त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण होते. अनेक शाळांमध्ये पंखे नाहीत तर जे आहेत त्यांची हवा विद्यार्थ्यांना लागत नाही त्यामुळे या मागणीचीही दखल घेण्याची अपेक्षा आहे.


