कंपनीतून सामानांची चोरी करणार्‍यास अटक


Arrested for stealing goods from the company जळगाव : एमआयडीसीतील एस-सेक्टरमधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लॅस्टिक कंपनीतून 36 हजार 500 रुपये किमतीचे ईलक्ट्रीक मोटार व साहित्य चोरणार्‍यास पोलिसांनी अटक केली आहे. विजय सीताराम प्रजापती (33, रा.रायपूर कुसुंबा, ता.जि. जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

असे आहे चोरीचे प्रकरण
एमआयडीसी परीसरातील सेक्टर-एस मधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लास्टिक दाना प्लांट कंपनीच्या मोकळ्या जागेतून संशयित आरोपी विजय प्रजापती याने शुक्रवार, 16 जून रोजी सकाळी 10 वाजता 18 हजार रुपये किंमतीची मोटार, प्लास्टीक कटर करणारे लहान व मोठे कटर असा एकूण 36 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीतील प्रमोद मराठे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी विजय प्रजापती यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !