महिलेच्या खुनाने एरंडोल हादरले : पती पोलिसांच्या ताब्यात


Woman’s murder shakes Erandole: Husband in police custody एरंडोल : कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना शहरातील गांधी पुरा, वखारीजवळील भागात सोमवार, 19 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत हर्षदा किरण मराठे (27, गांधी पूरा, वखारीजवळ) या विवाहितेचा मृत्यू झाला तर संशयित पती किरण महादू मराठे (35) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कौटूंंबिक वादातून डोक्यात मारली फरशी
मराठे दाम्पत्यात गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू होते व सोमवारी पुन्हा दाम्पत्यात वाद उफाळून आल्यानंतर संतप्त पतीन किरणने पत्नी हर्षलच्या डोक्यात घरातील फरशी मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाला. या घटनेचे माहिती कळताच एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला तर संशयित पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !