जामनेरात गुरांची अवैध वाहतूक रोखली : चार म्हशींची सुटका, एकाला अटक


Illegal movement of cattle stopped in Jamner : Four buffaloes rescued, one arrested जामनेर : अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असताना जामनेर पोलिसांनी कारवाई करीत चार म्हशींसह पारडूची सुटका केली. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली. ही कारवाई जामनेर शहरातील पाचोरा रस्त्यावर रविवारी दुपारी पाऊण वावजेच्या सुमारास करण्यात आली.

गुरांची निदर्यतेने वाहतूक
शहरातील बोदवड चौफुलीवर महेंद्रा बोलेरो (एम.एच.12 के.पी.1285) ही रविवारी दुपारी पावणेबारा वाजता आल्यानंतर पोलिसांनी तिची तपासणी केली असता गुरांची डॉक्टरांच्या प्रमाणपत्राशिवाय व अत्यंत निदर्यतेने व दाटीवाटीने वाहतूक होत असल्याचे दिसून आल्याने वाहन ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी वाहनातील तीन लाख 30 हजार रुपये किंमतीच्या तीन म्हशी व एका पारडूची सुटका करीत त्यांची रवानगी गो शाळेत करण्यात आली तर पाच लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.

हवालदार जगदीश गोसावी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक शेख कमाल शेख सुझान (22, कवटळ, ता.संग्रामपूर) विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र बिर्‍हाडे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !