पिंपरपाडा पाड्यातील आठवीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू


Eighth student of Pimperpada district died of snakebite चोपडा : तालुक्यातील आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणार्‍या पिंपरपाडा या पाड्यातील आठवीत शिकणार्‍या आदिवासी मुलाचा 18 रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. लखीराम सीताराम बारेला (16) असे मृत बालकाचे नाव आहे.

क्रोबा सर्पाच्या दंशाने बालकाचा जागीच मृत्यू
लखीराम हा सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी घराबाहेर आला असता कोब्रा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला. यानंतर थोड्याच वेळात प्रकृती बिघडल्याने त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लखीरामला मृत घोषित केले. या प्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात नोंद अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदन डॉ.सागर पाटील यांनी केले. यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला उपस्थित होते. मृत लखीराम हा हिंगणवाडे आश्रमशाळेत आठवीत शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !