पाळधीनजीक ट्रकच्या धडकेत कुसूंब्यातील लक्झरी चालकाचा मृत्यू
A luxury driver in Kusumba died in a collision with a police truck जळगाव : आयशर वाहनावर धडकल्याने कुसूंब्यातील युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पाळधी गावाजवळ सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. संदीप गोरख देसले (35, कुसुंबा, ता.जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आयशरवर धडकल्याने जागीच मृत्यू
संदीप देसले हा जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता व लक्झरीवर चालक म्हणून तो कामास होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते कासोदा येथून लक्झरीची ट्रिप आणून प्रवाशांना सोडले व त्यानंतर कासोदा येथून जळगावकडे येण्यासाठी दुचाकीने सोमवारी सकाळी येत असताना साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांनी धरणगांकडून जळगावकडे येणारी आयशरला हात दिल्यानंतर आयशर थांबताच दुचाकीस्वार संदीप देसले हा मागून धडकल्याने संदीपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई अरुणाबाई, वडील गोरख देसले, भाऊ दीपक, पत्नी सोनाली आणि ज्ञानेश्वरी व दर्पण हे दोन मुले असा परीवार आहे.


