कासारखेडा येथून दुचाकी चोरी : चोपडासह मध्यप्रदेशातील चौघांना अटक
यावल : तालुक्यातील कासारखेडा येथून मोटरसायकल चोरी झाली होती. या मोटरसायकल चोरी प्रकरणी यावल पोलिसांनी चोपडा तालुक्यातून चार जणांना अटक केली आहे. संशयितांकडून मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. चौघांना यावल न्यायालयात हजर केले असता चौघांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चौघा संशयितांना अखेर अटक ः दुचाकी जप्त
कासारखेडा, ता.यावल येथील बापू डिगंबर पाटील यांची मोटरसायकल (एम. एच.19 डी.ए.9646) ही त्यांनी घराबाहेर लावली असता 24 मे रोजी मध्यरात्री नंतर चोरीला गेली होती. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासअंती राजेश श्रीराम बारेला (चांदसणी, ता.चोपडा), मुकेश आबा बारेला (बोरअजंटी, ता.चोपडा), विजय श्रीराम बारेला (धुलकुट, ता.बडवानी, मध्यप्रदेश) व आकाश वसंत सोनवणे (रामपूरा, चोपडा) या चौघांना अटक केल्यानंतर त्यांनी चोरीची दुचाकी काढून दिली.
संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता यावल न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांनी त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तपास यावल निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान करीत आहे.



