भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. रमेश जोशी
भुसावळ : हिंदी सेवा मंडळ, भुसावळद्वारा संचलित श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, शिवाजी नगरच्या प्राचार्यपदी प्रा.डॉ.रमेश जोशी यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, नागपूरद्वारा मान्यता मिळाल्यानंतर ही निवड करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी असून या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.रवीकांत परदेशी, मंत्री मधुलता शर्मा, कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले, चेअरमन रमेश नागराणी, कोषाध्यक्ष अॅड.महेशदत्त तिवारी तसेच महाविद्यालयातील डॉ.सुधीर शर्मा, डॉ.पूनम त्रिवेदी, डॉ.विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल, अरुण कुडेकर, सुनील शर्मा आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.