भुसावळ शहरात श्री लक्ष्मी व्यंकटेश देवी-देवतांच्या प्रतिमेची शोभायात्रा
भुसावळ : शहरातील पांडुरंग टॉकीजमागीलश्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरातर्फे मंदिरातील देवी-देवतांची मंगळवारी शोभायात्रा काढण्यात आली. श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात रविवार, 18 जून ते मंगळवार, 20 जून दरम्यान दररोज सकाळपासून तर सायंकाळी नऊ वाजेपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रम हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला अनेक साधू संत महंत यांचे मार्गदर्शन लाभले. श्री 1008 बालकस्वामीजी केशवाचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले. मंदिराच्या कार्यक्रमाचे 26 वे वर्ष होते.
शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
मंगळवारी दुपारी पाच वाजता अष्टभुजा मंदिराजवळून श्री लक्ष्मी व्यंकटेश व अनेक देवी-देवतांच्या प्रतिमा सजवून वाजत गाजत शेकडो बंधू भगिनींच्या उपस्थितीत शहराच्या प्रमुख रस्त्यावरून भव्य दिव्य मिरवणूक (शोभायात्रा) काढण्यात आली. ठिक-ठिकाणी प्रतिमेची भक्तांनी पूजा करीत फुलांसह पाकळ्यांनी उधळण केली.
शोभायात्रा जामनेर रोड, अष्टभुजा देवी मंदिर, गंगाराम प्लॉट, पोस्ट ऑफीस, अप्सरा चौक, सराफ बाजार, गांधी चौकानंतर बालाजी मंदिरात मिरावणुकीचा समारोप झाला. महाआरती होऊन प्रसाद वाटण्यात आला.
यांचा शोभायात्रेत सहभाग
यावेळी सर्व समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष व मंदिराचे ट्रस्टी राधेश्यामजी लाहोटी, ब्रिजमोहन अग्रवाल, दीपक काबरा, राजेंद्र चांडक, भवरलाल दरगड, मधुलता शर्मा, मिलिंद अग्रवाल, रामवल्लभ झंवर, राठोड, जी.आर,ठाकूर, जे.बी.कोटेचा, मनोहर जगवाणी, संजय लाहोटी, गोविंद हेडा, मयूर नागोरी, राजेश पारीख, संजय अग्रवाल, श्याम अग्रवाल, सुरेश अग्रवाल, राजेश लड्ढा, पिंटू हेडा, भगवान चांडक
यांनी सहकार्य केले.



