रावेरात भाजपच्या ‘संपर्क से समर्थन’ अभियानाचा शुभारंभ


रावेर : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपातर्फे संपर्क समर्थन अभियानाची सुरुवात रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेरात खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन
उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चाचे सुरेश धनके, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजपा प्रदेश चिटणीस अजय भोळे यांनी रावेर शहरातील दिलीप पाटील, समृद्धी हॉस्पिटलचे डॉ.प्रवीण चौधरी, दृष्टी हॉस्पिटलचे डॉ.किशोर महाजन, अशोक वाणी, माजी उपनगराध्यक्ष अनिल अग्रवाल, रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार, भास्कर महाजन यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन मोदी सरकारमार्फत जनसामान्यांपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखा-जोखा मांडला व माहिती पत्रक वाटप करण्यात आले, तसेच जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येऊन, मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात आले. मोबाईल क्र.9090902024 वर मिस कॉल देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन करण्यात आले.

या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील,महेश चौधरी, माजी सभापती जितेंद्र पाटील, महेश पाटील, पि.के.महाजन, संदीप सावळे, दुर्गादास पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष वासू नरवाडे, उमेश महाजन, शुभम पाटील, नितीन पाटील, चेतन पाटील, उमाकांत महाजन, अजिंक्य वाणी, उमेश कोळी, राजेंद्र पाटील उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !