Bhusawal MLA Sanjay Savkare विकासकामांमध्ये राजकारण केल्यास नागरीकांचे नुकसान : भुसावळचे आमदार संजय सावकारे


Citizens will suffer if politics is involved in development works: Bhusawal MLA Sanjay Savkare भुसावळ : विकासकामे करताना विरोधकांनी त्यात राजकारण करून अडथळे आणल्यास त्यामुळे नागरीकांचे नुकसान होते त्यामुळे विरोधकांनी राजकारण जरुर करावे, मात्र कामात अडथळे आणू नयेत, अशी अपेक्षा आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त करीत विरोधकांवर टिकेचे बाण चालवले. भुसावळातील प्रभाग सातमध्ये रविवारी झालेल्या रस्त्यांची शांती व लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

भुसावळात रस्त्याची केली शांती
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतंर्गत शहरातील प्रभाग सातमध्ये रस्ता काँक्रीटीकरण कामासाठी मे महिन्यात वर्कऑर्डर देण्यात आली होती. या कामात स्थानिक राजकारणातून काम रखडले होते. अखेर हा रस्ता पूर्ण झाल्याने या रस्त्यासाठी पाठपुरावा केलेल्या माजी नगरसेविका अनिता सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांनी या रस्त्याची शांतीचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

सर्वाधिक निधी विकासकामांना
आमदार संजय सावकारे म्हणाले की, प्रभाग सातमधील अनेक भाग हद्दीबाहेर असल्याने या भागात पालिका प्रशासन निधी देवू शकत नाही. सतीश सपकाळे यांनी आपल्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा केल्याने सर्वाधिक निधी या भागातील विकासकामांना दिल्याचे सांगितले. या सोबतच या भागातील पाणीप्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी साकेगाव येथील जलजीवन मिशनमध्ये समावेश करण्यात आला असून काम युध्दपातळीवर पूर्ण केले जात आहे. लवकरच यातून पाणीपुरवठा होईल, असेही ते म्हणाले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, मनोज बियाणी, किरण कोलते, देवेंद्र वाणी, प्रा.दिनेश राठी, गिरीश महाजन, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, वसंत पाटील, अजय नागरणी, विशाल जंगले, पवन बुंदेले, योगेश पाटील, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !