One step back for Nathabhau : Aburnukasania case against Gulab Rao finally dropped नाथाभाऊंचे एक पाऊल मागे : गुलाबरावांविरोधातील अब्रु नुकसानीचा खटला अखेर मागे
One step back for Nathabhau : Aburnukasania case against Gulab Rao finally dropped जळगाव : राजकारणात नेहमीच कुणी कुणाचा शत्रू वा मित्रही नसतो असे म्हटले जाते व याची प्रचिती जिल्ह्याने आज घेतले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी बदनामी केल्याप्रकरणी दाखल केलेला खटला मागे घेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रूपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर जळगाव न्यायालयात त्याची सुनावणी सुरू झाली होती मात्र आता खडसेंनी हा खटला मागे घेतला असून समझोता झाल्यानंतर न्यायालयाने दोघांकडून लेखी घेतले. अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतल्याने शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलास मिळाला आहे.
असे आहे नेमके प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ एकनाथराव खडसे हे 2016 मध्ये मंत्री असताना त्यांच्या विरोधात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसर्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुद्धा केला होता.

दोघा नेत्यांमध्ये तडजोड
या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात मंगळवार, 27 जून रोजी सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्या संदर्भात आज सुनावणी पार पडली. यात एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.
