प्रा.उमेश पाटील यांना क्रीडारत्न पुरस्कार प्रदान


रावेर : शहरातील व्ही.एस.नाईक महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा.उमेश पाटील यांना नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते सईद जलालुद्दीन रीझवी, भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अशोक दुधारे, क्रीडा विभागाच्या उपसंचालिका सुनंदा पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे व शिवसेना संपर्कप्रमुख राजू लवटे आदी उपस्थित होते. प्रा.उमेश पाटील यांची क्रीडा क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. प्रा.उमेश पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे व्ही.एस.नाईक महाविद्यालयाचे चेअरमन हेमंत नाईक, प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल, उपप्राचार्य व्ही.बी.सूर्यवंशी, डॉ.अनिल पाटील, प्रा.एस.यु.पाटील, प्रा.डॉ.जी.आर.ढेंबरे, प्रा.धापसे, प्रा.धनले, प्रा.डॉ.मुख्यदल, प्रा.डॉ.तायडे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !