मंत्री मंडळ विस्तारांच्या चर्चांना आता पूर्ण विराम  : ठरली ही तारीख….!


Discussions on Cabinet expansions are now at a standstill: The date is decided….! मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मंत्री मंडळ विस्ताराच्या चर्चा झडत असताना त्यातून अनेक तारखा समोर आल्यानंतर चर्चेतील चेहरेदेखील समोर आले मात्र प्रत्यक्षात मंत्री मंडळ विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हत मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री मंडळ विस्ताराचा जुलै महिन्यात निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले आहेत.

दिल्ली बैठकीत विस्ताराचे ठरले सूत्र
देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौर्‍यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

जुलै महिन्यातच होणार विस्तार !
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. दरम्यान, शिंदे गटाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले.

त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नाही. केंद्राच्या व राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला राज्याच्या मंत्री मंडळ विस्तारात जास्त इंटरेस्ट आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !