भुसावळच्या नूतन तहसीलदारपदी निता लबडे
Nita Labade as new Tehsildar of Bhusawal भुसावळ : भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांची कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मालेगाव धान्य वितरण अधिकारीपदी बदली करण्यात आली होती तर त्यांच्या जागी प्रशांत सांगडे यांची नियुक्ती 12 रोजी काढण्यात आलेल्या आदेशानंतर करण्यात आली मात्र सांगडे यांनी पदभार न स्वीकारल्याने त्यांच्या जागी आता नियुक्तीच्या प्रतीक्षेत अमरावती विभागातून निता लबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात
शासनाचे उपसचिव अजित देशमुख यांनी शुक्रवार, 30 जून रोजी राज्यातील महसूल संवर्गातील नायब तहसीलदार व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. चोपडा तहसीलदारपदी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील भाऊसाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन अधिकारी सोमवारी आपला पदभार स्वीकारणार आहेत.

