महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री आता अजित पवार : राज्यातील राष्ट्रवादी पुन्हा मोठा भूकंप

राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचा गट अजित पवारांकडे : आठ आमदारांना मंत्री पदाची संधी


Ajit Pawar is now the new Deputy Chief Minister of Maharashtra : Nationalists in the state again a big earthquake मुंबई : पहाटेच्या शपथविधीने धक्का देणार्‍या अजित पवारांनी पुन्हा राष्ट्रवादीला धक्का देत भाजपा-शिंदे सरकारला पाठिंबा जाहीर करीत विरोध पक्षनेतेपदाचाी राजीनामा देत राजभवनात राजदरबार हॉलमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.राष्ट्रवादीच्या 54 पैकी 40 आमदारांनी अजित पवारांना समर्थने दिले आहे. त्यातील आठ आमदारांची मंत्री पदाची वर्णी लागल्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या.

आतापर्यंत यांचा शपथविधी
सुरूवातीला उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ व दिलीप-वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय-शकुंतला बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील (अमळनेर) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

यांना मिळू शकेल मंत्री पदावर संधी
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे-पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्मरावबाबा भगवान अत्राम
आदिती तटकरे
संजय बाबूराव बनसोडे
अनिल भाईदास पाटील (अमळनेर)

(आम्ही आज राज्यातील राजकीय भूकंप सातत्याने अपडेट करू, आपण लिंक रीफे्रश करीत रहा)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !