Sanjay Raut एकनाथ शिंदे काही दिवसातच मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार : संजय राऊत
Eknath Shinde will step down from the post of Chief Minister in a few days : Sanjay Raut मुंबई : राष्ट्रवादीतील सर्वात मोठ्या भूकंपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टिकेचे बाण चालवले आहेत. शिंदे यांच्यासह 16 आमदार लवकरच अपात्र होतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काही आमदारांवर भाजपाने आरोप केले होते मात्र आता त्यांच्यासोबत ते गेल्याने भाजपा आता या आरोपांबाबत काय करते? हे पाहणे उचित ठरेल, असेही ते म्हणाले. राज्याला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा यावेळी राऊत यांनी केला.
भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.
त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.. https://t.co/L42b0t0Nyh— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023

काय म्हणाले संजय राऊत ?
संजय राऊत यांनी ट्विट करत आजच्या घडामोडीवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, मी खंबीर आहे, लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभं करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.
आणखी एका ट्विटमध्ये राऊत म्हणतात, भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.”
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार… pic.twitter.com/fsBbIZGoFE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
