अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, नाही, नाही ; काँग्रेसने देवेंद्र फडणविसांचा तो व्हिडिओ केला शेअर
मुंबई : राज्यातील मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही. नाही, नाही, नाही. आपतधर्म नाही, शाश्वतधर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एकवेळ रिकामे राहू, सत्तेशिवाय राहू. मला कुणीतरी विचारलं की, तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, नाही, नाही असं म्हटलं आहे.
अखेर चर्चा ठरली खरी
अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली.

बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्याच्या सूचना
अजित पवार उपमुख्यमंत्री तर छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी होणार्या बैठकीत सर्व समर्थक आमदार एकत्र येणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावावा, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.
नाही नाही नाही……???????????? https://t.co/JbKfcdGjG9 pic.twitter.com/h3feHmJLTh
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 2, 2023
