रावेर शिक्षक संवर्धन संघाची 5 एप्रिलला निवडणूक
सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अ.वि.रावेरकर यांची घोषणा
रावेर : शहरातील सर्वात मोठी शाळा असलेल्या रावेर शिक्षक संवर्धन संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 5 एप्रिल रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा विद्यमान संस्थेचे अध्यक्ष अ.वि.रावेरकर यांनी सर्वसाधारण सभेत केली. शहरातील रावेर शिक्षण संवर्धक संघाची सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रावेरकर यांच्या अध्यक्षखाली झाली. यावेळी व्यासपीठावर चेअरमन प्रकाश मुजुमदार, प्रभाकर महाजन, पी.टी.पाटील, जगनाथ चौधरी, कन्हैय्याशेट अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते. ुगत दोन-चार वर्षापासून सभा घेतली नसल्याने सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. यावेळी मोठ्या संखने सभासद उपस्थित होते .
विद्यमान चेअरमन झाले भावूक
रावेर शिक्षक संवर्धक संघाचे विद्यमान चेअरमन प्रकाश मुजुमदार यांनी शाळा उभारणीसाठी केलेले काम सभेत सांगितले. मुला-मुलींच्या शिक्षणासाठी संस्थेसाठी वास्तु उभारणीसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले काम व आलेल्या अडचणी सभेत सांगुन काम करत असतांना काही चूक झाली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत ते भावूक झाले.



सर्वसाधारण सभेत यांनी मांडले विषय
यावेळी सर्वसाधारण सभेत वासुदेव महाजन यांनी नवीन सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा तर गोटू शेट यांनी घटना लवकरात मंजूर करण्याची मागणी केली तर डॉ.राजेंद्र आठवले यांनी निवडणूक 5 एप्रिला घेण्याची मागणी केली. गोपाळ पाटील, चंद्रकांत मिसर, हरीष गनवणी, तुषार मानकर आदींनी विविध विषय मांडले.
