प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले अर्जंटीनातील आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये शोधनिबंधाचे वाचन
Prof. Dr. Sunil Neve read the research paper in the international conference in Argentina भुसावळ : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे इंटरनॅशनल पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये शोधनिबंधांचे वाचन केल. 15 ते 19 जुलै दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना होणार्या या आंतरराष्ट्रीय परीषदेत प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी रशिया व युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परीणामांचा अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर केला.
यांची होती उपस्थिती
शोधनिबंध वाचनाच्या वेळी चेअर पर्सन गुलिरीओ (कोलंबिया), समन्वयक अलिना विदिमिरोवा (रशिया), डॉ.बेतीना रोंसिस्वली (अर्जेंटिना), गालारोटी (कोलंबिया), डॉ.मारीना लिनोस (जर्मनी), डॉ.अगस्ती मेरीसिस (पोर्तुगाल), प्रा.मरीसा अल्मदिया (लिस्बन) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.




देशासह देशभरातील मान्यवरांच्या नोंदवल्या प्रतिक्रिया
प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आपल्या शोधनिबंध मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील युध्दाचा भारतावर आर्थिक, राजकीय, सामाजिक, काय-काय परीणाम झाले याचे विवेचन केले. प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आपल्या संशोधनासाठी प्रश्नावली पद्धतीचा अवलंब केला. भारतातील आणि भारताबाहेरील एकूण 194 व्यक्तींच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या व त्यावरून निष्कर्ष काढले. भारतातील वाढलेल्या तेलाच्या किंमती, शेअर मार्केट कोसळणे, भारताची तटस्थेतची भूमिका, युक्रेनमध्ये अडकलेले मेडिकलचे विद्यार्थी, त्यासाठी भारताने केलेले प्रयत्न, भारतातील विरोधी पक्षांनी सरकारला केलेले सहकार्य, भारत आणि रशिया यांच्यातील असलेले राजनायिक संबंध, भारतात युद्धामुळे झालेले सामाजिक बदल, गहू निर्यातीवर झालेले परीणाम, रशिया युक्रेन युध्दाचे जागतिक परीणाम, भारतातील महागाई, जागतिक अन्न संकट, भारतीय रुपयाचे अवमूल्यन, खाद्य तेल, डिझेल, पेट्रोल, गॅस, यामध्ये झालेली वाढ, भारताची अलिप्तता वादाची भूमिका, भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर झालेले परीणाम, भारताचा जागतिक दृष्टिको न,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचेशी युद्ध थांबविण्यासाठी केलेले टेलिफोनीक संभाषण इत्यादी बाबींवर सखोल अभ्यास करून संशोधन पेपर वाचन केले.
युद्ध नको बुध्द हवा : प्रा.नेवे
सभागृहात बोलताना प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी जगातील आलेल्या सर्व प्रतिनिधींना सांगितले की, युद्ध नको बुध्द हवा. आम्हा भारतीयांच्या वतीने संदेश देवू इच्छितो की, आम्हाला जगात प्रेम, शांतता आणि आपुलकी व माणुसकी हवी आहे त्यासाठी आपण सारे वचनबध्द होवू या.
यांचे लाभले सहकार्य
या शोधनिबंधासाठी प्रा.बी.डी.पाटील (जामनेर), माजी प्राचार्य डॉ.पी.डी.देवरे(नाशिक), प्राचार्य डॉ.प्रमोद पवार (अमळनेर), प्राचार्य डॉ.मनोहर पाटील (धुळे , श्रृती दीपक नेवे (पुणे), प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे (भालोद), अतुल महाजन (भुसावळ), प्रा.गणेश चौधरी (भालोद), प्रा.मीनाक्षी वाघुळदे (भालोद), प्रा.डॉ.किरण चौधरी (भालोद), प्रा.डॉ.अजयकुमार कोल्हे (भालोद), प्रसन्ना कानळदेकर (अहमदाबाद), नम्रता नागेश नेवे (जळगाव), नंदिनी सुनील नेवे (पुणे), अटल सुनील नेवे (भुसावळ) यांचे सहकार्य लाभले.