सावखेडासीम येथून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण
यावल : यावल तालुक्यातील सावखेडासीम येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने फूस लावून पळवत अपहरण केले. हा प्रकार निर्दशनास आल्यानंतर पीडीत अल्पवयीन मुलाच्या पालकांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सावखेडासीम, ता.यावल येथील रहिवासी 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. त्याला घरी असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने कसले तरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडीत अल्पवयीनचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. पीडीतेच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.
