रावेर तालुक्यात अतिवृष्टी : आमदार शिरीष चौधरींकडून नुकसानग्रस्त पुलांची पाहणी


Heavy rain in Raver taluka : Inspection of damaged bridges by MLA Shirish Chaudhary  रावेर : शहरासह तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच रस्त्यांवरील पुलांचे भराव पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पुनखेडा पुलाजवळ तात्पुरती उपाययोजना केल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी या पाचही ठिकाणी भेट देऊन परीस्थितीची पाहणी केली. तातडीने उपाययोजना करून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या.

यांची होती उपस्थिती
शनिवारी दिवसभर रावेर तालुक्यात झालेल्या पावसाने भोकर व इतर नदीनाल्यांना पूर आला होता. या पुरात ठिकठिकाणच्या पुलाचे भराव वाहून गेले. यात बोरखेडा, रावेर, अभोडा, पुनखेडा, पातोंडी येथील नुकसानग्रस्त पुलांची पाहणी आमदार शिरीष चौधरी यांनी केली. त्यावेळी तहसीलदार बंडू कापसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय.एस.कोरके, अभियंता व्ही.के.तायडे, एम.पी.चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, बाजार समितीचे संचालक राजेंद्र चौधरी, सोपान साहेबराव पाटील, सरपंच योगेश पाटील, संतोष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुनखेडा पुलावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करीत वाहतूक सुरू करण्यात आली. उर्वरीत पाच पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना
पुनखेडा येथील पुलाजवळील भराव नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना आमदार शिरीष चौधरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना यावेळी केल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !