अट्रावल गावातील 22 वर्षीय तरुणाला सर्पदंश
यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथील एका 22 वर्षीय तरुणाला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
तरुणाची प्रकृती गंभीर
अट्रावल, ता.यावल येथील रहिवासी रवींद्र प्रकाश कोळी (22) या तरुणाला गावात सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका आरती कोल्हे, बापू महाजन, पिंटू बागुल आदींनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याची प्रकृती बिघडत असल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हवलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.
