भुसावळ बंदुकीच्या धाकावर सावत्र पित्याचा मुलीवर अत्याचार


Bhusawal rape of daughter by stepfather at the point of gun भुसावळ : पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या संशयिताने सावत्र मुलीवरच बंदुकीच्या धाकावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित गुन्हेगाराविरोधात अत्याचार व पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल होताच संशयिताला अटक
16 वर्षीय पीडीता परीवारासह एका भागात राहते. संशयित आरोपी हा पीडीतेचा नात्याने सावत्र बाप आहे. आरोपी जुलै 2021 ते 21 जुलै 2023 दरम्यान गावठी कट्ट्याचा धाक दाखवून सबको लाईन से मार दुंगा म्हणत धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. पीडीतेने अत्याचाराचा प्रकार असह्य झाल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत आपबिती वर्तवल्यानंतर पोलिसंनी संशयित गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल केला व त्यास अटक केली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भेट देत गुन्ह्याची माहिती जाणली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !