पन्नीमध्ये विकली जाणारी दारू बंद करा : यावल शहरात सर्वपक्षीय निवेदन


यावल : यावल शहर व तालुक्यात गावठी हातभट्टीची दारू सर्रास विक्री होत आहे. विशेष करून पन्नीमध्ये विक्री होणार्‍या या दारूमुळे अनेक बळी गेल्याने पन्नीमध्ये विक्री होणारी गावठी दारू बंद करण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन यावल पोलीस ठाण्यात देण्यात आले.

सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी दिले निवेदन
यावल येथील पोलीस ठाण्यात सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन दिले. त्यानुसार, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्हा आढावा बैठकीत पन्नीची दारू वॉश आउट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले मात्र यावल शहर व तालुक्यातील गावठी हातभट्टी पन्नीची दारू बंद होतांना दिसत नाहीये. गावठी हातभट्टीची पन्नी दारूच्या आहारी तरुण गेल्याने ते व्यसनाधीन झाले आहेत. या दारूमुळे अनेक बळीदेखील गेले आहेत. यावल पोलिसांनी आपल्या हद्दीतील पन्नीची गावठी दारू विक्री कायमची बंद करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना यांची उपस्थिती
निवेदन देतेप्रसंगी माजी नगरसेवक अतुल पाटील, बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, सेना शिंदे गटाचे भरत चौधरी, राजेश श्रावगी, पप्पू जोशी, भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मोहसीन खान, भाजपा जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष हेमराज फेगडे, शकील दौलत पटेलसह आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !