भुसावळ शहरात धाडसी घरफोडी : तीन लाखांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Bhusawal City : Three lakhs in lieu of Compensation भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या विठ्ठल मंदिर वॉर्डात तीन लाखांची धाडसी घरफोडी झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र सुरू झाल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
सेवानिवृत्त कर्मचारी शोभना प्रमोद पाटील (63) या बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील विठ्ठल मंदिर वॉर्डातील देशमुखवाड्यात राहतात. पाटील या कामानिमित्त बाहेर गेल्याने एक महिन्यांपासून तर सोमवार, 24 जुलैच्या पहाटे 6.15 वाजेदरम्यान चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधली. दोन लाख 58 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, 35 हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 93 हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. शोभना पाटील या घरी आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !