मुक्ताईनगरातील पेट्रोल पंप आवारातून चोरट्यांनी बॅटरी लांबवली


Thieves removed the battery from the petrol pump premises in Muktainagar मुक्ताईनगर : रक्षा पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनातून 44 हजार रुपये किंमतीची बॅटरी चोरट्यांनी लांबवली. ही घटना 20 ते 21 जुलैदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री केली चोरी
शहरातील रक्षा पेट्रोल पंपाच्या आवारात टाटा इंन्ट्रा वाहन (एम.एच.14 एच.जी.7583) उभे असताना चोरट्यांनी संधी साधून वाहनाची ताडपत्री फाडून पॅनासोनिक कंपनीची 44 हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चालक भूषण पंढरीनाथ नाथ (पेठ भाग, नशिराबाद) यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !