यावल बसस्थानकावर 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग


A 17-year-old minor student was molested at Yaval bus stand यावल : शहरात कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शहरातील एकाने पाठलाग केला व बसस्थानकावर तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडीतेच्या अल्पवयीन चुलत भावाला शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात एकाविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयिताविरोधात पोलिसात गुन्हा
यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये तालुक्यातील एका गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी येते. या अल्पवयीन मुलीचा यावल शहरातील रेणुका माता मंदिर परीसरातील रहिवाशी गोलू कोळी या तरुणाने पाठलाग केला व बस स्थानकावर मुलगी आली असता तिला सांगितले की, माझा मोबाईल नंबर तू घे व तुझा नंबर मला दे तेव्हा पीडीत मुलीने घाबरून त्याच्या चुलत भावाला बोलावले. या तरुणाने तिच्या चुलत भावालादेखील शिवीगाळ करीत धमकी दिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये पोस्को सह विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !