हजरत निजामुद्दीन वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट


भुसावळ : हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेस 27 व 28 जुलै रोजी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. हुबळी मंडळामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

ही एक्स्प्रेस बेलगवी ते वास्को-द-गामा पर्यंत रद्द राहील तसेच बेलगवीपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ही गाडी लोंढा, कॅस्टल रॉक, कुलेम, मडगाव, वास्को-द-गामा या स्टेशनमध्ये रद्द राहणार असून बदलाची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !