भुसावळ-लासलगाव दरम्यान नूतन डीआरएम यांचे निरीक्षण
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नूतन डीआरएम ईती पांडे यांनी गुरुवारी भुसावळ ते लासलगाव दरम्यान निरीक्षण यानद्वारे निरीक्षण केले.
यावेळी लासलगाव स्टेशनवर त्यांनी परीसराची पाहणी केली तसेच प्लॅटफॉर्मवर निरीक्षण करून योग्य त्या सुविधा पुरवण्याची संबंधित विभागातील अधिकार्यांना सूचना केल्या. मनमाड येथे व्यापार्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी व्यापार्यांनी आपल्या समस्या डीआरएम पांडे यांच्याकडे मांडल्या. या निरीक्षण दौर्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व संबंधित शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
