भुसावळात मणिपूर येथील हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराचा निषेध
भुसावळ : मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा शहरात निषेध करण्यात आला तसेच गंभीर घटना घडल्यानंतरही केंद्र सरकार या घटनेचा गांभीर्यपूर्वक विचार करून तेथील दोषींवर कारवाई करीत नसल्याने या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. या संदर्भात भुसावळ प्रांताधिकारी व
तहसीलदार यांना येथील शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था तसेच विविध संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले.
यांची निवेदन देताना उपस्थिती
निवेदनाद्वारे दोषींवर त्वरीत कारवाई करावी हा हिंसाचार व महिलांवरील अत्याचार त्वरीत थांबवण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री नेवे, राष्ट्रवादीच्या संगीता भामरे, वंदना सोनवणे, चांद तडवी, आम्रपाली, प्रतिमा यांच्यासह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
