फैजपूर शहरात घरफोडी : 47 हजारांची रोकड लांबवली
Burglary in Faizpur City : 47 thousand cash was extended यावल : फैजपूर शहरातील भुसावळ रोडवर गजाननवाडीमध्ये चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करून घरात कपाटातील 47 हजारांची रोख रक्कम लांबवली. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडीने उडाली खळबळ
फैजपूर शहरात भुसावळ रस्त्यावर गजानन वाडी आहे. गजानन वाडी भागातील रहिवासी अमोल दिलीप माहूरकर यांच्या घरात उत्तरेकडील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेली 47 हजारांची रोख रक्कम घेऊन अज्ञात चोरटा पसार झाला. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम.एच.सैय्यद करीत आहे.
