‘द अनसंग हिरो’ नाटकाने भुसावळकर रसिक दंग


भुसावळ : उत्कर्ष कलाविष्कार संस्था व पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्व.देविदास गोविंद फालक स्मृतीप्रीत्यर्थ ‘आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग, नवी दिल्ली आयोजित मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली) ‘द ब्रेड ऑफ लाईफ-डॉ. पांडुरंग खानखोजे-द अनसंग हिरो’ या नाटकाचे रविवार, 27 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजात पु.ओ.महाविद्यायात सादरीकरण केले. ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांनी स्व.देविदास गोविंद फालक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नाटकाचे उद्घाटन केले. प्रसंगी महेश फालक, अश्विन कुमार परदेशी, सुनील जैन, अनिल कोष्टी व बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते.

या कलावंतांचा नाटकात सहभाग
वर्धा जिल्ह्यातील क्रांतीकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानखोजे यांचे भारतात हरीतक्रांती घडवून आणण्यात सर्वात मोठे योगदान आहे, त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भारतातल्याच नव्हे तर परदेशातल्या भारतीय लोकांची देशासाठी मदत आणण्याची महत्वाची भूमिका बजावली. :द ब्रेड ऑफ लाईफ- डॉ खानखोजे : द अनसंग हिरो’ हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारीत आहे. पुष्पक भट, हर्षवर्धन देशमुख, कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेड़े, शुभम गौतम, अविनाश अरोरा, श्रेयस भारसाकळे, कुणाल टोंगे, कुणाल मेश्राम, सिद्धांत पटेल, चैतन्य दुबे, अनुक्षा आर्गे, महक त्रिपाठी, निश्चय बेलानी, बुद्धांश, शुभम शेंडे यांनी ऑनस्टेज भूमिका निभावली. प्रकाशयोजना अक्षय खोब्रागडे, संगीत संयोजन नारायण, संगीत संचालन निकीता ढाकुलकर,
रंगभूषा व वेशभूषा ऋतुजा वानखेडे, नेपथ्य अलियर, अंकित ठाकरे, शुभम गौतम, और प्रबंध व समन्वयन हितेश यादव, मयूर मानकर यांचे तर कला सहायक रीतेश, सिनोग्राफी अलियर यांची होती. विशेष सहाय्य सुनील खानखोजे व सावित्री पांडुरंग यांचे लाभले, पांडुरंग सदाशीव खानखोजे स्मृती संस्था यांचे ही संस्था मेराकी थिएटर यांनी आभार मानले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
नाटकाच्या यशस्वितेसाठी अनिल कोष्टी, धर्मराज देवकर, जयश्री पुणतांबेकर, पुष्कराज शेळके, किरण बाविस्कर, कुंदन तावडे, धनश्री जोशी, राजपालसिंग राजपूत, श्रीराम पाटील, सुशील पाटील, रौनक, उमेश गोरधे यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !