वाघोडमध्ये अवैध दारू विक्री : महिलांनी जाळल्या टपर्या
रावेर : तालुक्यातील वाघोडमध्ये अवैधरीत्या दारू विक्री होत असतानाही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त रणरागिणींनी चार विक्रेत्यांच्या टपर्या पेटवून दिल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली.
दारू विक्री बंदसाठी महिलांनी खोचला पदर
गुरूवारी सायंकाळी रणरागिणींनी एकत्र येत डॉ.आंबेडकरनगरात एका विक्रेत्याला अवैधरीत्या दारू विक्री बंद करण्याची तंबी दिल्यानंतर दुर्गा नगरात रणरागिणी आल्यनंतर त्यांनी गजानन रघुनाथ तायडे यांना अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली मात्र तायडे यांनी हुज्जत घातल्याने त्यांचे बसस्टॅण्डवरील टपरीवजा दुकान जाळले तसेच गजानन प्रकाश तायडे, कौतीक बळीराम महाजन, देवानंद रमेश मशाने, अरुण पितांबर मशाने यांच्या टपर्या महिलांनी जाळल्या. या घटनेची माहिती कळताच रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलिस निरक्षक शीतलकुमार नाईक यांनी वाघोड गाठले. यावेळी पोलिसांनाही संतप्त महिलांनी जाब विचारला.



