पिंप्रीसेकम शिवारातून 12 हजारांचे साहित्य लंपास
12,000 worth of materials from Pimprisekum Shivar
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातून 12 हजार 600 रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. 28 ते 29 दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
सुपरवायझर विकास कौतीक वाघोदे (38, फेकरी, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, पिंप्रीसेकम शिवारातील 192 शेत गट क्रमांक जवळील रेल्वे गेटजवळून चोरट्यांनी सात हजार 200 रुपये किंमतीचे नऊ पत्रे, पाच हजार 400 रुपये किंमतीचे लोखंडी पाईप असे एकूण 12 हजार 600 रुपये किंमतीचे साहित्य लंपास केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वाघोदे यांनी तालुका पोसिात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस नाईक योगेश पालवे करीत आहेत.








