साकळी बस स्थानकावर उतरलेल्या अंजाळेतील प्रवाशाचा चक्कर येवून पडताच मृत्यू


A passenger from Anjale who alighted at Sakli bus station died after getting dizzy यावल : यावल तालुक्यातील अंजाळे येथून चोपड्याला जात असताना 53 वर्षीय इसमाला अस्वस्थ वाटू लागले व तो साकळी बसस्थानकावर उतरला असता चक्कर आल्यानंतर जमिनीवर कोसळताच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यशवंत बळीराम सोनवणे (53, अंजाळे) असे मयताचे नाव आहे.

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा अंदाज
सोनवणे हे यावल बसस्थानकावरून चोपडा जाण्यासाठी निघाले असता साकळी या गावापर्यंत त्यांना त्रास होऊ लागला व अस्वस्थ वाटू लागल्याने साकळीच्या बसस्थानकावर उतरले. बसस्थानकावर येताच त्यांना चक्कर आला व ते जमिनीवर कोसळले. हा प्रकार प्रवाशांनी पाहिला आणि यावल पोलिसांना माहिती दिली. सोनवणे यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वासुदेव सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार सिकंदर तडवी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !