अज्ञात वाहनाच्या धडकेने चिखली गावातील तरुणाचा मृत्यू


A young man from Chikhli village died after being hit by an unknown vehicle मुक्ताईनगर : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने चिखलीतील 33 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात खडसे फार्म हाऊसजवळ मंगळवार, 1 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला. जितेंद्र रवींद्र वाघ (33, चिखली, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध
जितेंद्र हा तरुण दुचाकी (एम.एच.19 बी.डब्ल्यू.1573) ने व्हॉल घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे जात असताना अज्ञात वाहनाने तरुणाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला तर दुचाकीचे मोठे नुकसान झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील खडसे फार्म हाऊसजवळ घडला. अपघात प्रकरणी गजानन प्रल्हाद वाघ (44, चिखली) यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लिलाधर भोई करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !