कुर्हा हरदो येथील तरुणाची आत्महत्या
Suicide of youth from Kurha Hardo बोदवड : बोदवड तालुक्यातील कुर्हा हरदो गावातील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. सुनील मधुकर इंगळे (28, कुर्हा हरदो, ता.बोदवड) असे मयताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी घडली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील इंगळे या तरुणाने चिंचखेड प्रगणे शिवारातील शेत गट क्रमांक 113 च्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाला चादरीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदीप झंवरलाल करीत आहेत.








