सावदा पालिकेचा 140 वा स्थापना दिन उत्साहात


सावदा : सावदा नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश राजवटीत 1 ऑगस्ट 1843 साली झाली होती. त्यावेळी जनतेतून तसेच निम्मे ब्रिटिश सराकरने नेमलेले अशी व्यवस्था होती. त्या नंतर स्वातंत्र्योत्तर काळात ही नगरपालिका अधिक भरभराटीस आली. नगरपालिकेत आतापर्यंत 14 नगराध्यक्षांनी कार्यकाळ पाहिला तर मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी स्थापना दिनाला 140 वर्ष पूर्ण झाल्याने हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

14 नगराध्यक्षांनी पाहिला कार्यकाळा
नानासाहेब विष्णू हरी पाटील यांनी सुमारे 40 वर्ष एकहाती सत्ता राबविली व अनेक शहर विकासाची कामे केली. त्यानंतर त्यांचे पुत्र रवींद्र विष्णू पाटील यांनीही त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. मुख्यतः सावदा शहरासाठी मांगलवाडी येथील तापी नदीतून पाणी योजना मंजूर करून ती पूर्णत्वास आणून शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटविला. त्यानंतर आलेल्या प्रत्येक नगराध्यक्षांनीदेखील त्यांच्या माध्यमातून शहर विकासाची विविध कामे केली सावदा नगरपालिकेस जिल्ह्यातील एक विकसीत व प्रतिष्ठित नगरपालिका बनविली. आतपर्यंत 14 नगराध्यक्षांनी कार्यकाळ पाहिला.

केक कापून स्थापनादिन उत्साहात
नगरपालिका कर्मचार्‍यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ केक कापून स्थापना दिवस साजरा केला. यावेळी लेखापाल भारती पाटील यांनी केक कापला. यावेळी कार्यालय अधीक्षक सचिन चोळके, पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, आरोग्य विभाग कर्मचारी अरुणा चौधरी, आकाश तायडे, सामान्य प्रशासन विभागाचे संजय माळी, सतीश पाटील, लेखा विभागाचे विशाल पाटील, विमलेश जैन, बांधकाम विभागाचे हमीद तडवी, वसुली विभागाचे अरुण ठोसरे, बबन तडवी, यांच्यासह राजू साळी, राजू मोरे, संदीप वाणी, विजू चौधरी, चंद्रकांत धांडे, धीरज बनसोडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !