बोरखेडा खुर्दला घराच्या छतावरून खाली पडल्याने 60 वर्षीय वृद्धेचा मृत्यू


A 60-year-old man died after falling from the roof of a house in Borkheda Khurdala
यावल :
यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द गावातील घराच्या छतावर काम करणारा 60 वर्षीय इसम छतावरून तोल जावून खाली पडल्याने मयत झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हुसेन बलदार तडवी (60) असे मयताचे नाव आहे.

तोल जावून पडताच मृत्यू
तडवी हे आपल्या घराच्या छतावर काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला व ते छतावरून जमिनीवर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रारंभी यावल ग्रामीण रुग्णालयात व नंतर डॉ.उल्हास पाटील हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्‍हाटे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !