खिर्डी सरपंच-उपसरपंचांवरील अविश्वास बारगळला


Distrust of the Khirdi Sarpanch-Upasarpanches was rampant खिर्डी : खिर्डीतील सरपंचांसह उपसरपंचाविरोधात सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यावर बैठक घेण्यात आली मात्र बैठकीच्या दिवशी ऐनवेळी सहा सदस्यांनी पाठ फिरवल्यानंतर हा बुधवार, 2 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव बारगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने केवळ दोन अनुकूलता दर्शवली मात्र अविश्वास प्रस्तासासाठी नऊ सदस्यांची मते आवश्यक असल्याने अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.

राजकीय चर्चांना मिळाला पूर्णविराम
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील सरपंच राहुल नारायण फालक व उपसरपंच पुष्पा कैलास पाटील यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दशरथ कोचुरे व सात सदस्यांनी रावेर तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. अविश्वास प्रस्ताव देण्यामागे अनेक कारणे नमूद करण्यात आली होती व त्यानंतर तहसीलदारांनी या संदर्भात अविश्वास प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीचे आयोजन केल्यानंतर अविश्वास ठराव मंजुरीसाठी नऊ सदस्यांची आवश्यकता असताना ऐनवेळी सहा सदस्य अनुपस्थित राहिल्याने अविश्वास बारगळला. ठरावाच्या बाजूने दोन विरोधकांनी अनुकूलता दर्शवल्याने व व ठरावाच्या विरोधात तीन मिळाल्यानंतर अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. या बैठकीला सरपंच उपसरपंचासह एकूण तीन सदस्य उपस्थित होते.

मतदानावेळी सदस्य राहिले अनुपस्थित
खिर्डी सरपंचांसह उपसरपंचाविरोधात अविश्वास प्रस्ताव पारीत होण्यासाठी सभेप्रसंगी सहा सदस्य अनुपस्थित राहिल्याने ठराव बारगळणार असल्याचे स्पष्ट झाले. प्रशिक्षणार्थी अपर तहसीलदार डॉ.मयुर कळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी सदस्यांना नियमांची कल्पना व समज दिली. अविश्वास ठरावासाठी सरपंच-उपसरपंचाच्या विरोधात दोन सदस्यांनी हात वर केले. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या एक चतुर्थांश सदस्यांची आवश्यकता असलीतरी केवळ प्रस्तावाच्या विरोधात दोनच मते आल्यानंतर अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला. अविश्वास ठराव फेटाळण्यात येत असल्याचे यावेळी कळसे यांनी सांगितले. यावेळी महसूल सहाय्यक भूषण कामळे, खिर्डी तलाठी एच.पी.जोशी, खिर्डी खुर्द ग्रामसेवक शरद देवराम बढे, निंभोर्‍याचे निरीक्षक गणेश धुमाळ, गावातील पोलीस पाटील प्रदीप पाटील, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, हवालदार रीजवान पिंजारी, अशरफ तडवी, कोतवाल अनंता कोळी आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !