वंचित बहुजन आघाडीची उद्या भुसावळात बैठक


Vanchit Bahujan Aghadi meeting in Bhusawal tomorrow भुसावळ : मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी व विविध आदिवासी संघटनांच्या वतीने विराट उलगुलान महामोर्चा 9 रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी नियोजन बैठक भुसावळ शहरातील पंचशील नगरातील शहिद अब्दुल हमीद सभागृहात शनिवार, 5 रोजी दुपारी 12 वाजता होत आहे.

पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन
या बैठकीस वंचित बहुजन आघाडी, जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे सर्व आजी-माजी सन्माननीय जिल्हा पदाधिकारी, युवा आघाडी, महिला आघाडी, सर्व सन्माननीय तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन उलगुलान मोर्चा शमिभा पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, महासचिव दिनेश इखारे, जिल्हा समन्वयक बाळा पवार आदींनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !