फैजपूरला 7 ऑगस्टपासून सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह
फैजपूर : फैजपूर गावातील श्रीराम मंदिराच्या सभागृहात अधिक मासनिमित्त सामूहिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व सामूहिक विठ्ठल नामजपाचे 7 ते 14 ऑगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
दररोज पहाटे पाच ते साडेसहा दरम्यान काकडा आरती, त्यानंतर विष्णूसहस्त्रनाम, सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरीपाठ, रात्री 8 ते 9 सामूहिक विठ्ठल नामजप होईल. श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्ञानेश्वरी कंठस्थ ह.भ.प.गोपाळ महाराज विवरेकर, प्रवचन सेवा महामंडलेश्वर जनार्दनहरीजी महाराज, ह.भ.प.दुर्गादास महाराज खिर्डीकर देतील. सामूहिक विठ्ठल नामजप ह.भ.प.शिवशंकर महाराज लांडे (आळंदी), ह.भ.प. शिवाजी महाराज पाटील (धुपेश्वर मलकापूर), मृदंगवादक ह.भ.प. तुकाराम महाराज बोरोले, न्हावीकर असतील. सोमवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 11 दरम्यान ह.भ.प.गोपाळ महाराज विवरेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मंदिर व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीने केले आहे.
