किनगावातील तरुणाने भुसावळातील तापी पात्रात मारली उडी : बेपत्ता तरुणाचा कसून शोध
A young man from Kingaon went missing in Tapi Patra in Bhusawal भुसावळ : यावल तालुक्यातील किनगावातील तरुणाने भुसावळातील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्यानंतर वाहत्या पाण्यात तरुण बेपत्ता झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता घडली. अयुब शेख गयास (36, रा.किनगाव, ता. यावल) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तरुण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
पुराच्या पाण्यात तरुण बेपत्ता
शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तापी पूलावर पिवळ्या रंगाची आप्पाची गाडी (एम.एच.19 डी.डी.1054) लावल्यानंतर अयुबने तापी नदीच्या पूलावरून उडी घेतली. हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर तापीला आलेल्या पुराच्या पाण्यात अयुब वाहून गेला. शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तापी नदी गाठली. काही पोहणार्यांना सुध्दा माहिती दिली मात्र अयुब हा आढळला नाही. पोलिसांनी तापी पूलावर असलेली पिवळ्या रंगाची मोटर सायकल ताब्यात घेतली आहे.








