28 वर्षीय तरुणाला शेतात जाताना सर्पदंश
यावल : यावल तालुक्यातील डोंगरकोठारा येथे दुचाकीद्वारे शेतात जात असतांना एका 28 वर्षीय तरुण शेतकर्यास सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच शेतकर्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
उजव्या पायाला सर्पाने केला दंश
डोंगरकठोरा येथील विनोद पोपट कोलते (28) हा तरुण शेतकरी दुचाकीद्वारे शेतात जात असताना शेत-शिवारात जात असतांना अचानक त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार त्याच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता आणण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारीका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, वैद्यानिक अधिकारी एन.एस.घोडके, अमोल अडकमोल आदींनी त्याच्यावर उपचार सुरू केले.








