Kannad Ghat वाहनधारकांनो लक्ष द्या : कन्नड घाट 11 ऑगस्टपासून जड वाहतुकीसाठी बंद


Attention motorists : Kannada Ghat closed for heavy traffic from August 11 चाळीसगाव : औरंगाबाद खंडपीठाने कन्नड (औट्रम) घाटातील वाहतूक कोंडीत अडकणार्‍या वाहन धारकांना दिलासा दिला आहे. खंडपीठाने 11 ऑगस्टपासून कन्नड-चाळीसगाव दरम्यानचा औट्रमघाट (कन्नड घाट) हा काही अपवाद वगळता जड वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे आता घाटात दररोज होणारी कोंडी थांबणार असून वाहनधारकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या.वाय.जी.खोब्रागडे यांनी याबाबतचे आदेश पारीत केले आहेत.

सात दिवस प्रबोधन करण्याचे आदेश
अ‍ॅड. ज्ञानेश्वर बागूल, अ‍ॅड. निलेश देसले आणि अ‍ॅड. श्रीकृष्ण चौधरी यांनी कन्नड घाटाच्या वाहतूक कोंडीबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी 11 ऑगस्टपासून या घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घातली. सात दिवस शासकीय यंत्रणेने याबाबत प्रबोधन करावे, असे निर्देशही न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले आहेत







या वाहनांना केवळ आता घाटातून मिळणार प्रवेश
औट्रम घाटातून यापुढे फक्त दुचाकी, चारचाकी वाहने, राज्यातील आणि परराज्यातील महामंडळाच्या प्रवासी बस, आवश्यकता भासल्यास क्रेन, फायर ब्रिगेड गाड्या, शेती उपयोगी ट्रॅक्टर, अ‍ॅम्ब्युलन्स, विशेष परीस्थितीत संरक्षक दलाची वाहने यांनाच वाहतुकीसाठी परवानगी असणार आहे.

या वाहनांना असेल घाटातून बंदी
जड वाहने, मल्टीएक्सल व्हेईकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !