यावलला मेरठच्या मल्लाने गाजवली कुस्त्यांची दंगल


A wrestling riot was celebrated by the Malla of Meerut at Yawal  यावल : शहरात पेहरन ए शरीफ निमित्त गुरूवारी कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. या दंगलीत मेरठ, उत्तर प्रदेश येथून आलेल्या मल्लांनी चाळीसगाव येथील पहेलवानाला आसमान दाखवत चीत केले. मध्यप्रदेशातील खंडवा येथील 12 वर्षीय मुलीने मुलास चीत करून मैदान गाजवत दिलेली लढत लक्षवेधी ठरली. यावल शहरात पेहरन ए शरीफ निमित्ताने गुरूवारी सायंकाळी चोपडा रस्त्यावरील अक्सा नगरासमोर कुस्त्यांची दंगल झाली.

मेरठचा मल्ल ठरला विजेता
या दंगलीमध्ये महाराष्ट्रातील चाळीसगाव, भुसावळ, मालेगाव, रावेर, रसलपुर सह गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मल्ल दाखल झाले. यात प्रामुख्याने लक्षवेधी लढत उत्तर प्रदेशातील मेरठमधील शकील नूर पहेलवान आणि चाळीसगावच्या बबलू पैलवानात झाली. उत्तर प्रदेशातील मेरठच्या पहिलवानने बबलू यास आसमान दाखवत तब्बल 62 हजार रुपयांचे बक्षीस जिंकले. या कुस्तीच्या सामन्यांमध्ये राज्यभरातील आलेल्या मल्लांच्या कुस्त्या या लक्षवेधी ठरल्या.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कुस्त्यांची सुरुवात काँग्रेसने एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, भुसावळचे माजी नगरसेवक नईम पहेलवान, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, भाजपचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, अनिल जंजाळे, विक्की गजरे सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कुस्तीच्या दंगलीत रेफ्री म्हणून इमरान पहेलवान, मुस्ताक पहेलवान सलीम पहेलवान, बादिल पहेलवान यांनी कामकाज पाहिले. यशस्वीतेसाठी सैय्यद युनूस, शेख कलीम शेख अमीन, रफीक खान, शेख एजाज, नूर मोहंमद गुलाम गौस,सईद शाह, गुलाम रसुल दस्तगीर, इरफान खान, शेख याकुब, इद्रीस खान, शेख रहेमान आदींनी परीक्षण केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !